एका स्टिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आलेल्या महिलेने अत्यंत संतापजनक आणि आई या शब्दाला काळीमा फासणारे सत्य कबुल केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव इरिना आहे. आरोपी महिलेने पोलिसां समोर कबुल केले की, ‘आम्ही श्रीमंत व्यक्तीचा माग काढत मॉस्कोमध्ये आलो. कारण १३ वर्षीय मुलीकडून वेश्याव्यावसाय करवून पैसे कमावता येईल.आरोपी महिला आणि तिच्या मित्राला मॉस्कोमधील एका रेस्टॉरंट मध्ये स्टिंग ऑपरेशन करून अटक करण्यात आली. आरोपी महिलेने १९,१०० पौंडला (१६ लाख, ८० हजार रुपये) आपल्या १३ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले होते. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीलाही ताब्यात घेतले असून तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews